मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

जळगाव | महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं मोठं महत्त्व आहे. अशातच आता उत्तर महाराष्ट्राचं राजकारण आज जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे (Election of Jalgaon District Bank Results) पुन्हा ढवळूून निघाल्याचं पहायला मिळतंय.

अशातच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्व जागांच्या मतमोजणीत धक्कादायक निकाल लागल्याचं पहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीने भाजपला धक्का देत एकतर्फी विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीच्या 20 उमेदवांरानी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. एकून 21 जागांपैकी 20 जागा या महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाल्या आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीला 20 जागा तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवारांने बाजी मारली आहे. या 21 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात 11 जागा आल्या आहेत, तर 7 जागेवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसला देखील या निवडणुकीत 2 जागा मिळाल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

ओबीसी राखीव महिला मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा एकतर्फी विजय झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी रोहिणी खडसे यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे.

आजचा हा विजय म्हणजे गेल्या 6 वर्षात केलेल्या कामची पावती असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. आता यापुढे देखील शेतकरी हिताचं आणि जिल्हा बँकेच्या हिताचं काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा देखील या निवडणुकीत विजय झाला आहे. त्यांनी जळगाव जिल्हा बँकेकडून निवडणूक लढवली आहे.

आताच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचं वर्चस्व पहायला मिळालं. त्यामुळे विरोधकांचं डिपाॅसिट देखील यावेळी जप्त झालं आहे.

दरम्यान, या दणदणीत विजयानंतर भाजपने आम्हाला छुपी मदत केल्यामुळे आमचा विजय झाला, अशी खोचक प्रतिक्रिया निकालानंतर सतिश पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…” 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत” 

“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत” 

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘फोटोबॉम्ब’; वानखेडेंचं टेंशन वाढलं