अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे

नवी दिल्ली | जगातील प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतलं आहे. एलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी ट्विटरमध्ये 9% हिस्सेदारी विकत घेतली होती.

आता मस्क यांनी ट्विटर इंकचा 100% हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे.

ट्विटर मस्क यांच्यासोबत हा करार करण्याची तयारी करत होते. मस्क यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर कंपनी आणखी चांगल्या ऑफरचा शोध घेत होती. पण मस्क यांना ट्विटर मिळवण्यात यश मिळालं आहे.

भाषण स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. ट्विटर हे असंच एक डिजिटल टाउन आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते, असं ते म्हणालेत.

ट्विटरचे मालक झाल्यानंतर मस्क यांनी पहिलं ट्विट केले त्यात त्यांच्या वक्तव्याचं स्क्रिन शॉट शेअर केले आहेत. ज्यात मस्क यांनी ट्विटरवर फ्री स्पीच होण्याची मागणी केली होती.

मस्क यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार केला होता. जिथं यूझर्स त्यांना हवं ते लिहू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण 

“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात” 

“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…” 

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!

भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…