रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

नवी दिल्ली | सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या जमिनीवर सुरू असलेल्या या युद्धात युक्रेनची सेना रशियन सैन्याला जोरदार उत्तर देत आहे.

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये आपलं सैन्य पाठवलंय. तरीही युक्रेन अजूनही नमला नाही. तेवढ्याच ताकदीनं रशियासोबत लढताना दिसत आहे.

युक्रेन एकाकी राहिलेला असला तरी त्याने गुडघे टेकवले नाहीत. अशातच कोणताही देश युक्रेनच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसत नाही.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी असणार्या एलोन मस्क यांनी उडी घेतली आहे. रशियाऐवजी एलोन मस्क यांनी युक्रेनला मदत केली आहे.

एलोन मस्क हे SpaceX चे सीईओ आहेत. त्यांनी युक्रेनला उपग्रह ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी युक्रेनला मदत करत Starlink टर्मिनल पाठवले आहेत. त्यामुळे आता एलोन मस्कच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे.

युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विटरवर एलोन मस्क यांच्याकडे मदत मागितली, त्यानंतर मस्कने त्यांचे टर्मिनल युक्रेनला पाठवले.

दरम्यान, काही देश युक्रेनच्या बाजूने उभे राहिले नसले तरी आता जगातील बलाढ्य कंपन्या युक्रेन रशिया युद्धात मोलाची भूमिका बजावत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये

मोठी बातमी! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल