टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…

नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व टेस्लाचे मालक एलॉन मस्क नेहमीच चर्चेत असलेले पहायला मिळत असतात.

एलाॅन मस्क यांनी नुकतंच  तब्बल 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली आहे. त्यामुळे मोठ्या ते प्रमाणात चर्चेत आले होते.

जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (TESLA) लवकरच भारतात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. याच्या चर्चाही नेहमीत होत असातात.

टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत आणण्याविषयी एलाॅन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

भारत जोपर्यंत टेस्लाने बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत भारतात नव्या कार बनवणार नसल्याचं एलाॅन मस्क यांनी म्हटलं आहे.

टेस्ला भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारचं भारतात विकू शकेल अशी अट भारत सरकारनं ठेवली आहे. त्यामुळे  टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय एलॉन मस्क यांनी स्थगित केला आहे.

टेस्ला भारतात यायला आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ

  “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”

  Monsoon Update| हवामान खात्यानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  …म्हणून शरद पवारांनी बाहेरुनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

  कोरोनाविषयी मुख्यमंत्र्यांचं सूचक आवाहन, म्हणाले…