113 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश???

मुंबई : एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. ते आता राजकाराणात उतरतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 

प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ते काही महिन्यातच ते निवृत्त होणार होते. मात्र त्यांना 4 जुलैला स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे.

व्यैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे. नियमांप्रमाणे राजीनामा देत आहे, असंही त्यांनी शर्मा यांनी सांगितलं आहे. 

पोलीस महासंचालकांनी शर्मा यांनी दिलेल्या अर्जावर अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता शर्मा यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

प्रदीप शर्मा हे सेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याने ते शिवसेना किंवा भाजपात युतीचे उमेदवारही असण्याची शक्यता आहे. 

शर्मा यांच्या पक्षातील प्रवेशाचा निर्णय ज्येष्ठांशी चर्चा करुन घेण्यात येण्याचीही शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटक सरकारचं भवितव्य आज ठरणार

-अजित पवारांचा यू-टर्न, अखेर विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

“कुलभूषण जाधव यांना सुखरुप आणणे हाच सरकराचा खरा पुरुषार्थ ठरेल”

-तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची ‘विकेट’???

-शिवाजीराव आढळराव पाटलांची मस्ती जिरली- अजित पवार