एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा मंजुर; या मतदारसंघातून लढवणार विधानसभा???

ठाणे : राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदिप शर्मा हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक होते. प्रदिप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकारणात एंन्ट्री करणार असल्याचं बोललं जात होतं. 

शर्मा यांचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. 

प्रदिप शर्मा यांचा राजीनामा स्विकारण्यात आल्याने ते राजकारणात जाणार हे निश्चित मानलं जात आहे. प्रदिप शर्मा यांना शिवसेनेकडून आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी झाल्याची माहिती आहे. 

प्रदिप शर्मा यांनी 4 जुलै रोजी पोलीस विभागाकडे स्वेच्छानिवृत्ती अर्ज सुपूर्त केल्यानंतर सर्वाना धक्का बसला होता. पण त्यानंतर प्रदिप शर्मा काय करणार? या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची गुप्त बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे हे शर्मा यांना शिवसेनेत येण्यासाठी गळ घालत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शर्मा हे शिवसेनेत जाणार असल्याचं समजतंय.

महत्वाच्या बातम्या-