खेळ

अखेर इंग्रजांना चारीमुंड्या चीत करण्यात भारत यशस्वी; पाहा कसा मिळाला विजय!

भारत विरूद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी मिळवलेल्या विजयामुळे भारताने या मालिकेत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. सध्या भारत 1-2 ने पिछाडीवर आहे.

भारताचा पहिला डाव 329 धावांत संपला होता. भारताकडून विराट-अजिंक्य वगळता भारताचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले होते. इंग्लंडला पहिल्या डावात 161 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं होतं. हार्दिक पांड्याने 5 फलंदाजांना तंबूत धाडलं होतं.

कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसरा डाव 7 बाद 352 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

भारतानं दिलेलं हे आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. काल चौथ्या दिवसअखेर त्यांची 9 बाद 311 अशी अवस्था होती. 317 धावांवर त्यांचा डाव आटोपला आणि भारताला विजय मिळाला.