खेळ

असला कसला विश्वविजेता?; आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा संघ अवघ्या 85 धावात गारद

लंडन : अवघ्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटचा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावात बाद झाला आहे. 

लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात आयर्लंडच्या मुर्तघने 9 षटकात 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडरने 3 आणि बॉईड रँकिनने 2 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

विश्वचषकात तुफान फॉर्मात असलेला जेसन रॉय 11 चेंडूत अवघ्या 5 धावा करु शकला, तर दुसरीकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार ज्यो रुट फक्त 2 धावा करुन माघारी परतला.  

विश्वचषक विजेत्या संघातील इतर फलंदाजांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची मोठी झोड उठण्याची शक्यता आहे. 

इतक्या निचांकी धावसंख्येत बाद होण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ नाही. 28 जानेवारी 1887 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लडचा संघ अवघ्या 45 धावात बाद झाला होता. पण धक्कादायक बाब म्हणजे आश्चर्यकारक खेळी करत इंग्लंडने हा सामना चक्क जिंकला होता.

दरम्यान, 2019च्या विश्वषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या थरारक अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये आयसीसीच्या एका नियमामुळे सामना जिंकला होता. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडने बरोबरीत धावा केल्या होत्या, मात्र इंग्लंडचे चौकार जास्त असल्याने न्यूझीलंडने विजेतेपद गमावलं.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा मोर्चाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवू; निवडणूक लढण्यावरुन मोर्चात वाद

“एक दिवशी भाजपला कळेल प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही”

-निवडकर्त्यांचं काम लोकांना खूश करणं नाही- सौरभ गांगुली

-काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार पण…; प्रकाश आंबेडकरांनी घातली ‘ही’ अट!

IMPIMP