बर्मिंघहॅम | आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकातली दुसरी सेमी फायनल रंगत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे. मात्र त्यांची भारताप्रमाणे दाणादाण उडालेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्यासाठी आलेल्या अॅलेक्स कॅरी याने जिगरबाजपणाचं दर्शन घडवलं आहे.
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने 86 मिल प्रति तासाच्या वेगाने टाकलेला भेदक बाऊन्सर अॅलेक्स कॅरीच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. तो बाऊन्सर एवढ्या वेगात होता की ते हेल्मेट त्याच्या डोक्यावरून तर उडालंच मात्र अॅलेक्सच्या हनुवटीतून रक्त वाहू लागलं.
एवढी कठीण परिस्थिती असताना देखील हॅरी दुखापतीने मैदानाबाहेर गेला नाही. मैदानाबाहेर न जाता तो प्लास्टर बांधून खेळला. त्याच्या या कृत्याचं क्रिकेटविश्वात स्वागत होतंय. क्रिकेट रसिक त्याच्यावर स्तुतीसुमने उधळतायेत.
जोफ्रा आर्चरचा 86 मिल प्रति तासाचा वेगाने टाकलेला भेदक बाऊन्सरने त्याच्या हेल्मेटवर आदळून हेल्मेट उडाल्यानंतर ते स्टम्पवर पडणार इतक्यात त्याने चपळाई दाखवत ते हेल्मेट पकडले अन् विकेट जाण्यापासून स्वत:ला वाचवले.
दुखापत झाल्यानंतर इंग्लंडचे सगळे खेळाडू अॅलेक्सजवळ आले आणि त्याला सहारा दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची मेडिकल टीम मैदानात येऊन त्यांनी अॅलेक्सला औषध दिलं.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची इंग्लंडसमोर दाणादाण उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 49 षटकांत सर्व बाद 223 धावांपर्यंतच ऑस्ट्रेलिया मजल मारू शकली. या सामन्यात कोण जिंकतो आणि फायनलमध्ये न्यूझीलंडशी कोण दोन हात करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Running repairs ???? Alex Carey battles on #CWC19 pic.twitter.com/NkIQ4lMQZ5
— cricket.com.au (@cricketcomau) July 11, 2019
How cool are you on a scale of 1 – Alex Carey? #ENGvAUS ????pic.twitter.com/xJm7S0c1Ya
— Lucy Bluck (@LucyBluck_) July 11, 2019