“सलमान स्वत:ला काय समजतो, हा बिचुकले काय आहे ते त्याला दाखवतोच”

मुंबई | बाॅलिवूड जगतात सलमान खानचा एकच दरारा आहे. सलमान खानसोबत कोणी पंगा घेतला असेल त्याला त्याचे परिणाम सहन करावे लागतात.

बिग बाॅस शो मध्ये गेल्यानंतर अभिजीत बिचुकले चांगलेच चर्चेत होते. सहकलाकारांसोबतच्या वागणुकीमुळे बिचुकले यांना मोठ्या प्रसंगाला समोरं जावं लागलं होतं. परिणामी आता बिचुकले या शोमधून बाहेर पडत आहेत.

अशातच शोमधून बाहेर पडल्यानंतर देखील बिचुकलेने सलमान खानवर टीका करण्याचं कोणतंच माध्यम सोडलं नाही. बिचुकले यांनी सतत सलमानवर टीका केली आहे. अशातच आता बिचुकले यांनी सलमानला सुचनावजा धमकीच दिल्याचं पहायला मिळतंय.

अभिजीतने बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. अभिजीतचा शोमधील प्रवास फार मोठा नसला तरी तो खूप चर्चेत राहिला आहे. अखेरीस मोठा वाद झाल्याचं देखील पहायला मिळालं होतं.

बिचुकलेच्या वागणुकीमुळे सलमानने बिचुकलेला झापलं होतं. त्यामुळे सलमान आणि बिचुकले यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं पहायला मिळालं.

सलमानने आतापर्यंत 14 सीझन चालवले आहेत, पण 15वा सीझन माझा होता, इथं तो माझ्यापेक्षा कमी आहे. ज्या प्रकारची भाषा त्यांनी माझ्यासोबत वापरली, ती आजपर्यंत कोणीही बोलली नाही, असा आरोप बिचुकलेनी केली आहे.

आतापर्यंत वाघ पिंजऱ्यात होता, त्यामुळे तो शिकारी होत होता, आता वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे. सलमान खान स्वतःला काय समजतो?, असंही बिचुकले म्हणाले आहेत.

आता मी त्याला दाखवीन की मी काय आहे. त्याच्यासारखा 100 सलमान मी रस्त्यावर उभा करीन, असंही बिचुकले म्हणाले आहेत.

सलमान खान अजूनही अंड्यात आहे. त्यांना अजूनही अंड्यातून बाहेर यायचे नाही. मी शो सोडणार होतो. मला अशा शोची गरज नाही, असंही बिचुकले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

याड लागलं! डेव्हिड वाॅर्नरला लागलंय ‘पुष्पा’चं याड, आणखी एक व्हिडीओ व्हायरल

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”

“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो