मुंबई | बाॅलीवूडमध्ये मोठं नाव असलेले जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. एकामागून एक सशक्त व्यक्तिरेखा साकारत तो सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहे.
बाॅलीवूडमध्ये हळव्या मनाचे कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, चित्रपटात त्यांनी अनेक बेधडक पात्र साकारली आहेत. अशाच जॅकी श्राॅफने आपल्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा सर्वांसमोर मांडला आहे.
अलिकेडेच एका कार्यक्रमात अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी बोलताना जॅकी श्राॅफने आपल्या भावाच्या मुत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.
त्यांच्या ज्योतिषी असलेल्या वडिलांनी आपल्या भावाच्या मृत्यूपूर्वी भाकीत केलं होतं, असा खुलासा जॅकी श्रॉफने केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्विंकल देखील चकीत झाल्याचं पहायला मिळालं.
आज काहीतरी वाईट होणार आहे, त्यामुळे तू आज बाहेर कुठे जाऊ नको, असं त्यांच्या वडिलांनी भावाला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या भावाचा अपघातात मुत्यू झाला, असंही जॅकी श्राॅफ यांनी सांगितलं आहे.
माझा भाऊ गिरणी कामगार होता. वडिलांच्या सल्ल्यानुसार तो गिरणीमध्ये गेला नाही. मात्र, एका व्यक्ती पाण्यात बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी पोहायला येत नसताना देखील त्याने पाण्यात उडी मारली.
दुसऱ्याला वाचवण्यासाठी तो बुडून मरण पावला, असंही जॅकी श्राॅफ यांनी सांगितलं आहे. तेव्हा माझ्या वडिलांची भविष्यावाणी खरी ठरली, असा किस्सा जॅकी श्राॅफ यांनी सांगितला.
दरम्यान, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, तू अभिनेता होणार आणि मी अभिनेता झालो, असं जॅकी श्राॅफ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण
“असं काही घडू नये, पण घडलंच तर…”, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मला संपवण्याचा कट होता, एक गाडी…’; पडळकरांचा जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप
‘… त्यासाठी डोकं आणि अक्कल लागते’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
“जीन्सवाल्या पोरींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत, ते…”