Top news मनोरंजन

सलमान खानला म्हणायचंय काय?, भाईजानच्या पोस्टमुुळं सस्पेंस वाढला!

salman khan e1642694842646
Photo Credit- instagram/beingsalmankhan

मुंबई | बाॅलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला आहे.

काही दिवसांपासून सलमान खानला साप चावल्यानंतर त्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या मजेशीर अंदाजाला पसंती दिली होती.

अशातच आता भाईजानची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर सलमानने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत भाईजान सलमान खान ग्रे टी-शर्ट घातल्याचं दिसतोय तर डोक्यावर गमछा बांधल्याचं दिसत आहे.

फोटो शेअर करत सलमाने एक कॅप्शन दिलं आहे. याच कॅप्शनमुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे.

मी माझ्या अकाऊंटवरुन जाहिराती आणि ट्रेलरसारख्या गोष्टी तर शेअर करत असतोय. आपलाच ब्रॅन्ड आहे ना, कळलं का?, असं सलमान म्हणाला.

मी ऐकतोय अन् सगळं पाहतोय. आज एक पोस्ट.. तर उद्या एक टीजर, असं सलमान फोटो शेअर करत म्हणाला आहे.

दरम्यान, या कॅप्शनमधून सलमानला नक्की काय म्हणायचंय? असा सवाल विचारला जात आहे. सलमानच्या या पोस्टमुळे अनेक चाहते बुचकाळ्यात पडल्याचं दिसत आहे.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


महत्त्वाच्या बातम्या – 

“चांगला माणूस कसा बिघडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील”

 अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज