नॅशनल क्रश रश्मिकाला हवाय असा नवरा, वाचा काय काय आहेत अटी

मुंबई | स्वत:च्या सौंदर्यानी आणि स्माईलने चाहत्यांना घायाळ करणारी नॅशनल क्रश रश्मिका मंदना नेहमी चर्चेचा विषय असते. रश्मिका नुकतीच पुष्पा या चित्रपटातून घराघरात पोहोचली होती.

अल्लु अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. सामी सामी आणि श्रीवल्ली या गाण्यामुळे आता रश्मिका सर्वांच्या स्टेटसवर झळकत आहे.

अशातच एका कार्यक्रमात रश्मिकाने वयक्तिक गोष्टींवर भाष्य केलं आहे. इंडिया टुडेशी बोलताना रश्मिकाने प्रेमावर आपलं मत मांडलं.

विजय देवराकोंडा याच्यासोबत रश्मिकाचं नाव लावलं जात होतं. त्यावर दोघांनी नकार देखील दिलाय. आम्ही दोघं चांगले मित्र असल्याचं तिने सांगितलं.

तुम्ही एकमेकांचा आदर करता, त्यांचा सन्मान करता तेव्हा तुम्हाला प्रेमाची किंमत कळते, असं रश्मिका म्हणाली. त्यावेळी तिने प्रेम म्हणजे काय हे सांगणं कठीण असल्याचं देखील म्हटलंय.

प्रेम हा भावनेचा खेळ आहे. प्रेम हे दोन्ही व्यक्तींकडून हवं. पण, ते एकतर्फी असल्यास त्याचा काय उपयोग, असंही ती यावेळी म्हणाली आहे.  प्रेम म्हणजे जिथं तुम्ही एकमेकांचा आदर करता, वेळ देता आणि एकमेकांसोबत सुरक्षितता अनुभवता, असंही ती म्हणाली.

मला असा जोडीदार हवा आहे ज्याच्यासोबत मी आरामदायक वाटू शकेन. मी लग्नासाठी खूप लहान असल्यानं याबद्दल काय विचार करावा हे मला माहित नाही., असंही रश्मिका म्हणाली आहे.

माझा जोडीदार असेल त्याच्याकडून मला या साऱ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मी हे सगळे गुण असलेल्या व्यक्तीवर प्रेम करणं पसंत करेल, असंही रश्मिका म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता बस, कार सोडा… EV फ्लाइंग टॅक्सीनं ऑफिसला जा!

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!

“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”