मुंबई | काल म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुल्का याचे अकाली निधन झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांना तर या घटनेवर अजुनही विश्वास बसत नसल्याचं समजतं आहे.
सिद्धार्थ शुक्लाने टीव्ही सिरिअलमध्येही काम केलं आहे. कलर्स मराठीवरील ‘बालिका वधू’ या मालिकेत त्यानं शिवाची ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील आतापर्यंत या तीन प्रमुख कलाकारांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला, मालिकेत मोठ्या आनंदीची भूमिका साकारलेली प्रत्युषा बॅनर्जी आणि दादीसा हे पात्र करणारी सुरेखा सीकरी यांचा समावेश आहे.
सुरेखा सीकरी यांचे 16 जुलै 2021 रोजी निधन झाले. यांचे वय त्यावेळी 75 वर्षे होते. सुरेखा बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचं बोललं जात होत. तसेच 2018 मध्ये त्यांना अर्धांगवायूही झाला होता. दादीसा ही भूमिका साकारणाऱ्या सुरेखा सीकरी यांनी हे पात्र खूप रंगवलं. त्यांच्या अभिनयाच्या शैलीमुळे त्या घराघरा लोकप्रिय झाल्या.
त्यांनी अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या करिअरच्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. परंतू बालिका वधू ही मालिका त्यांच्यासाठी एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरली.
बालिका वधू या मालिकेत प्रमुख पात्र आनंदी हे होत. सुरूवातीला छोट्या आनंदीची भूमिका अविका गौरने साकारली होती. तर मोठ्या आनंदीची भूमिका प्रत्युषा बॅनर्जीने. प्रत्युषा बॅनजीचे निधन 1 एप्रिल 2016 झाले. प्रत्युषाच्या निधनाची बातमी कळाल्यानंतरही सर्वांना धक्का बसला होता.
तिचा मृत्यू झाला नसून तिने आत्महत्या केली असल्याचं बोललं जात होतं. परंतू प्रत्युषाच्या आई-वडीलांनी आपल्या मुलीची हत्या झाली असल्याचा दावा केला होता. आजही आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्युषाचे आई-वडील कोर्टात लढत आहेत.
तसेच, सिद्धार्थ शुक्लाने 1 सप्टेंबरच्या रात्री काही गोळ्या घेतल्या होत्या. त्या घेऊन तो झोपला पंरतू सकाळी तो उठलाच नाही. हे लक्षात येताच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.
बालिका वधूमधील या तिन्ही कलाकरांच्या मृत्यूनंतर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्काच बसला आहे. इंडस्ट्रीने उच्च प्रतिचे कलाकार गमावले असल्याचं बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम
सिद्धार्थच्या मृत्यूमागे आहे सुशांतच्या मृत्यूचं रहस्य?
सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर
सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शहनाजला असहय्य, वडिलांनी दिली तिच्या प्रकृतीबद्दल माहिती
कोणासोबत एक रात्र घालवशील? भूमी पेडणेकर म्हणते…