मुंबई | आपल्या अप्रतिम आणि लयबद्ध संगीताच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीत-दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं सर्वांना धक्का बसला आहे.
बप्पी लाहिरी यांना संगीत क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओखळण्यात येतं. लाहिरींनी आपल्या अप्रतिम संगीतानं अनेकांच्या आयुष्यात नवचेतना निर्माण केली आहे.
बप्पी दा यांच्या निधनानं संगीत क्षेत्राची कधीच न भरून येणारी हानी झाली आहे. अशातच आता बप्पी यांचं ज्या आजारानं निधन झालं त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया नावाच्या आजारानं बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे. हा आजार तसा सामान्यच आहे पण याचा धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बप्पी लाहिरी यांना हा आजार बऱ्याच दिवसांपासून होता. ते डाॅक्टरांच्या सल्ल्यानं या आजारावर उपचार घेत होते. पण या आजारातून बप्पी लाहिरी हे सावरू शकले नाहीत.
झोपेत श्वास घेण्यास अडचण येणं हे या आजाराचं प्रमुख लक्षण आहे. नाकाच्या वरच्या भागात हवा कोंडते परिणामी श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो. झोपेत तर हा प्रकार अधिक जाणवतो. याच आजारानं बप्पी लाहिरी यांचं निधन झालं आहे.
श्वसननलिका ही लहान होऊन बंद पडण्याचा धोका या आजारामध्ये अधिक प्रमाणात आहे. झोपेत अचानक श्वास बंद पडला तरी कळत नाही. परिणामी अशी लक्षणं जाणवत असतील तर डाॅक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
खराब जीवनशैली, जेवणाची बदलेली पद्धत, वारंवार घोरण्याची सवय, दिवसा झोप येणे, लठ्ठपणा या समस्या असतील तर काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त वजन असणे, आहारावर लक्ष न देणे यामुळं हा आजार उद्धवू शकतो.
दरम्यान, व्यायाम करणे, योगासन करणे, निरोगी राहणे, आहारावर लक्ष देणे या गोष्टी केल्या तर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
महत्त्वाच्या बातम्या –
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले
‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका