शरद पवारांच्या भेटीनंतर अभिनेते किरण माने म्हणाले, “माझ्यासोबत जे काही घडलं…”

मुंबई | सोशल मीडियावर रोखठोक राजकीय भूमिका मांडल्यानंतर लगेचच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना एका मालिकेतून बाहेर काढण्यात आलं होतं.

स्टार प्रवाह वाहिनीच्या या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे.

किरण माने यांना मालिकेतूून बाहेर काढल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या गोष्टींचा निषेध देखील केला आहे.

अशातच अभिनेता किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

माझ्याबाबत जे काही घडलं त्यासाठी दाद मागण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली आहे, असं किरण माने यांनी सांगितलं आहे. सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला एकच नेता म्हणजे शरद पवार आहे असं अभिनेता किरण माने म्हणाले

सांस्कृतिक दहशतवादाविरोधात आवाज उठवायचा असेल तर एकच नेता आहे जो विवेकी आहे, विचारी आहे, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक देखील केलं आहे.

मी शरद पवार यांच्यासमोर माझी भूमिका मांडली आहे. मी त्यांच्याजवळ दाद मागितली. शरद पवारांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.  त्यांनी मला काही प्रश्न देखील विचारले, असंही किरण माने म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्यासमोर कोणतीही खोटी व्यक्ती टिकू शकत नाही, असंही किरण माने म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल

  “कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार” 

  राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल