Top news देश

कोण आहे ही ‘बिकिनी गर्ल’??? काँग्रेसने दिलंय थेट आमदारकीचं तिकीट

bikini girl e1642083025188
Photo Credit- instagram/Archana Gautam

लखनऊ | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशचं (UP Election) राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी गुरुवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनुसार काँग्रेसने 40 टक्के महिलांना तिकीट दिलं आहे. या यादीतील एका उमेदवाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

या यादीत अभिनेत्री अर्चना गौतमचंही (Archana Gautam) नाव आहे. अर्चनाला मेरठमधील गौतममधील हस्तिनापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं आहे.

अर्चना गौतम एक अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. अर्चना गौतम 2014 साली मिस उत्तर प्रदेश बनली होती.

यानंतर ती मिस बिकिनी इंडिया, मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्सची विजेती ठरली. त्यामुळे आता ती बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

अर्चना गौतमने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अर्चना गौतमने आयआयएमटी, मेरठ येथून बीजेएमसीमध्ये पदवी घेतली.

त्यानंतर तिने माॅडलिंगच्या दुनियेत पाय ठेवला. अर्चना गौतमने विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी स्टारर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

दरम्यान, माॅडलिंगच्या दुनियेतून आता राजकारणाच्या दुनियेत येत असल्याने आता अर्चनाचे फँन्स देखील आनंदात आहेत. त्यामुळे आता अर्चना गौतमला किती यश मिळतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

समांथासोबतच्या घटस्फोटावर नागाचैतन्यचा मोठा खुलासा, म्हणाला…

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

 श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…