Top news मनोरंजन

टिकटाॅक स्टार सुरज चव्हाणची ‘गोलीगत’ झेप; लवकरच ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार

suraj chavan e1642251558293
Photo Credit- instagram/suraj chavan

मुंबई | सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेकजण प्रकाशझोतात येतात. काहीजण रातोरात स्टार बनतात. एक साधा व्हिडीओ देखील आयुष्य बदलून टाकू शकतो. (suraj chavan will work in marathi film as lead actor)

काही महिन्यांपूर्वी भारतात टिकटाॅकवर बंदी आणण्यात आली होती. मात्र, टिकटाॅकमुळे अनेकांची आयुष्य बदलली आहेत. अनेकजण या काळात टिकटाॅक स्टार झाले.

अशातच भुरे केसं, सावळा रंग आणि बोबडी भाषा असा असणारा तरूण म्हणजे सुरज चव्हाण. सुरज चव्हाण आपल्या ‘गोलीगत’ आणि ‘बुक्कीत टेंगुळ’ या दोन डायलाॅगमुळे चांगलाच फेमस झाला होता.

अशातच आता हाच सुरज चव्हाण आता लवकर मराठी चित्रपटात झळकणार आहे. सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांच्या रूपरी पडद्यावर सुरज चव्हाण दिसणार आहे.

‘का रं देवा’, या मराठी सिनेमामध्ये सुरज चव्हाणला घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांनी त्याला ही संधी दिली आहे.

प्रशांत सर मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला, असं सुरजने सांगितलं आहे.

मुळचा बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी असलेला सूरज चव्हाण अनाथ आहे. त्याच आयुष्य खुपच खडतर होतं. मात्र, टिकटाॅकमुळे तो प्रसिद्धीस आला.

दरम्यान, आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपलं आई-बाप मानतो. आता थेट चित्रपटात काम मिळाल्यानं त्याचं आयुष्यच बदलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोनाला दूर ठेवायचंय! व्यायामाचे ‘हे’ 5 प्रकार घरच्या घरी करा

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल