मुंबई | दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाची धुळ चाखल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिजशी दोन हात करणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 3 वनडे आणि 3 टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची निवड केली. वनडे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय संघ खेळणार आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनासह दोन खतरनाक अष्टपैलू खेळाडूंनाही टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं वनडे संघातून बाहेर व्हावं लागलं होतं.
सुंदरने अनेकदा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियासाठी सामना जिंकवून दिले आहे. अनेकदा भारताला गरज असेल तेव्हा फलंदाजीत देखील मोठं योगदान दिलं आहे.
यासोबतच त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत सुंदरने निवड समितेचे दरवाजे ठोठावले होते. वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियामध्ये अक्षर पटेलला देखील स्थान देण्यात आलं आहे.
अक्षर पटेलने गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले, जिथे त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरूद्ध देखील चांगली कामगिरी केली होती.
अक्षर पटेल मध्यक्रम गोलंदाजीत खूप किफायतशीर ठरू शकतो. यासोबतच डेथ ओव्हर्समध्ये बॅटने चमत्कार करण्याची ताकदही पटेलकडे आहे. त्यामुळे आता रविंद्र जडेजाची जागा भरण्याची काम अक्षरकडे असेल.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुल दुसऱ्या वनडेपासून उपलब्ध असेल. अक्षर पटेल T20I साठी उपलब्ध असेल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
दरम्यान, गुडघ्याच्या दुखापतीनंतर आर जडेजा तंदुरुस्तीच्या अंतिम टप्प्यातून जात आहे आणि तो एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही, अशी माहिती देखील मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”
“तो फोटो कुणी काढला?, हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा”
“दोन व्यक्तींची मनं आता नितीन गडकरीच जुळवू शकतात”
न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय