राज्यात उद्या राजकीय भूकंप होणार???, आदित्य ठाकरे यांचं सुचक वक्तव्य

मुंबई | राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा उदय हाच मोठ्या राजकीय संघर्षाची सुरूवात ठरला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून राज्यात नवीन सत्तासंघर्ष चालू झाला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस या तीन पक्षांच्या कठीण वाटणाऱ्या मैत्रीला सुरूवात झाली. तर शिवसेना आणि भाजपसोबत राजकीय वादाला देखील सुरूवात झाली.

2019 च्या सत्ता बदलापासून केंद्रीय तपास यंत्रणा आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार वारंवार राज्यातील नेते करत आहेत. परिणामी सत्तासंघर्ष वाढला आहे.

भाजपविरोधात सत्ता स्थापन केली म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिला जात आहे, असंही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राऊत शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

संजय राऊत यांनी आपण पत्रकार परिषदेत मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं आहे. परिणामी देशातील राजकीय जाणकारांचं लक्ष आता या बहूचर्चित पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी देखील सुचक वक्तव्य केलं आहे.

आधी टाॅस होवू द्या, मग बॅटींगचं बघू, असं सुचक वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे हे राज्यात राजकारणात मोजकं बोलून विरोधकांना जखमी करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा सुरू झालीये.

दरम्यान, शिवसेनेतर्फे या पत्रकार परिषदेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. परिणामी राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारण पेटणार यात कसलीही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

झोपेत बायकोने केलं असं काही की…, नवऱ्याने लावला डोक्याला हात

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”