खेळ

विश्वविजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार नाराज; म्हणतो…

लंडन : विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा विजय झाला. विश्ववि़जयानंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या विजयावर त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

सामन्याचा निर्णय ज्या पद्धतीनं झाला तो होणं योग्य नव्हतं, असं म्हणत मॉर्गनने विश्वचषकाच्या फायनलमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

झालेला सामना बरोबरीचा होता. त्यामुळं अशा परिस्थितीत कोणत्याही एका प्रसंगावरुन निर्णय देणं योग्य वाटत नाही, असं मॉर्गन म्हणाला आहे. 

मी तिथे होतो. त्यामुळं प्रत्यक्षात काय घडलं हे मला माहित आहे. हा सामना अत्यंत थरारक होता. त्यामुळं  कोणत्याही क्षणी आपला विजय असं म्हणू शकत नव्हतो, असं मॉर्गनने सांगितलं. 

फायनलमध्ये टाय झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरला. 

आयसीसीने दिलेल्या निर्णयावरुन इंग्लंडला विजयी घोषित केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला. 

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार???; अजित पवार म्हणतात…

-महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्वात मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही पण…

क्रिकेटपटूंच्या बायका आणि प्रेयसींचा खर्च किती?; ‘सीओए’नं तपशील मागवल्याने खळबळ

-घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्न सुटणार नाही; आढळरावांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

-अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला आढळराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणतात…

IMPIMP