भलामोठा चित्ताही या’ प्राण्याला पाहून गेला पळून, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | काही लोकांना अनेक प्राणी आवडतात. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचा, वेगवेगळ्या प्रजातींविषयी माहिती काढायची असे अनेक छंद लोकांमध्ये असतात. तसेट काही लोकांना तर आपल्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी पाळायचाही खूप शौक असतो.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हाणामारीचे असतात. तर कधी त्यामध्ये जंगलामधील प्राण्यांचेही असतात.

आपल्याला माहित आहे की, चित्ता हा एक असा प्राणी आहे की, त्याला पाहिलं तरी सगळे प्राणी आपला जीव वाचवत पळत सुटतात. तसेच चित्त्याने एखाद्याची शिकार करायची ठरवली की, त्या प्राण्याचा लचका तोडल्याशिवाय तो शांत बसत नाही.

तुम्ही याआधी कधी एका चित्त्याला दुसऱ्या कोणत्या प्राण्याला पाहून पळताना पाहिलं आहे का?. नसेल पाहिलं तर सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये चक्क एक भलामोठा चित्ता एका लहानशा मांजरीला पाहून पळताना दिसतं आहे. एका जंगलाच्या रसत्यावर एक चित्ता आणि एक मांजर आहे. सुरूवातीला चित्ता त्या मांजरीवर खूप जोरात धावून जातो.

परंतू तरीही ती मांजर आपल्या जागेवरून हालत नाही. ती आहे त्याच जागी उभी राहते. ती मांजर आपल्याला पाहून पळून का नाही गेली, हे पाहण्यासाठी तो चित्ता तिच्या जवळ जातो. तर अचानक ती मांजर त्या चित्त्यावर हल्ला चढवते.

ते पाहून तो चित्ता चक्क घाबरतो आणि त्या ठिकाणाहून पळायला लागतो. चित्त्याला असं घाबरलेल्या अवस्थेत पाहून बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUSDJRoAQoj/?utm_source=ig_embed&ig_rid=b7d944f6-7bbe-4f01-b446-b27148b2605d

महत्वाच्या बातम्या-

समुद्रात हरवलेल्या कुत्र्याला एका डॉल्फिनने केली ‘या’ प्रकारे मदत, पाहा व्हिडीओ

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा काय आहे सोन्याचा दर

गल्लीतील दोन महिलांच्या भांडणामध्ये पडला तरूण अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी!