मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता लसीकरणावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचं पालनही करण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच कोरोनाचा धसका घेतलेल्या एका माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोनानं एवढा हाहाकार माजवला आहे की फक्त माणसंच नाही तर प्राण्यांनाही कोरोनाची भीती वाटू लागली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका माकडानं रस्त्यावरचा मास्क उचलत आपल्या तोंडाला लावलेला पाहायला मिळतंय. त्यानं मास्कनं चक्क आपलं पूर्ण चेहराच झाकलेला दिसतोय.
माकडाची मास्क लावण्याची हटके स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. माकडालाही कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
कोरोनाच्या भीतीनं प्राणीही मास्क लावायला लागले आहेत. मात्र काही माणसांना कधी समजणार की मास्क लावणं किती महत्वाचं आहे. किमान या व्हिडीओवरुन तरी मास्कचं महत्व समजायला हवं.
कोरोना काळात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. नेटकरीही अशा व्हिडीओला पसंती दर्शवत असतात. त्यामुळे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचावासाठी सर्वसामान्यांच्या हातातील सर्वात मोठं हत्यार मास्क बनलं आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’नं धुमाकूळ घातलेला दिसतोय. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं.
महत्वाच्या बातम्या –
आता अलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज
बाॅयकाॅटनंतर पुन्हा एकदा राधिकाचा बोल्ड लूक; सोशल मीडियाचं तापमान वाढवलं
बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उलटी उडी मारली अन्…; पाहा व्हिडीओ
दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…
‘शेरशाह’ चित्रपटासाठी सिध्दार्थने घेतलं तब्बल ‘इतके’ कोटी रुपये मानधन