प्रेमाची एक गोष्ट अशीही! ‘या’ व्यक्तीनं प्रेयसीला भेटण्यासाठी 7000 मैलांचा प्रवास केला सायकलवर, वाचा सविस्तर

मुंबई| प्रेम एक सुखद आणि चिरकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणतीही बंधन नसतात. सोशल मीडियामुळे आज जग खूप जवळ आलं आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यामातून एकमेकांशी बोलू शकतात, मात्र पहिल्या काळी अशी काही सुविधा नव्हत्या.

पन्नास वर्षापूर्वी पत्रव्यवहारातून एकमेकांशी संवाद साधला जायचा. दोन देशांतील लोकांना एकमेकांवर प्रेम झालं तर त्यांना पत्राच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधावा लागायचा. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी सात-समुद्रापार असलेल्या प्रेमासाठी, प्रेमावर असणाऱ्या विश्वासासाठी, सगळी बंधन मोडत एकमेकांशी जीवनगाठ बांधली.

1970 साली प्रद्युम्न कुमार महानंदिया हे भारतातील ओडिशामधील एका खेडेगावात, जातीव्यवस्था मानणाऱ्या एकदम खालच्या स्तरातील घरात जन्माला आले. जातीनुसार ते अस्पृश्य दलित होते. त्यांचा कुणाला चुकून हात लागला तर तो मुलगा हात धुवायचा, गावातील मुले खेळायला घेत नसत, त्यांना दगडी फेकून मारत, अशी परिस्थिची स्वातंत्र्यानंतरही कायम होती.

समाजाकडून आपल्याला अशी वागणूक मिळायची या गोष्टीचं त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यामुळे ते दुःखी असायचे. मात्र त्यांची आई त्यांना नेहमी सांगायची की, दुःखी होण्याचं काही कारण नाही. तुझ्या आयुष्यात पुढे खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे.

हे बोलण्यामागे कारण होतं की, महानंदिया यांच्या आईनं त्यांच्या जन्मानंतर भविष्य पाहिलं होतं. त्या भविष्यात असं सांगितलं होतं की, “याचं लग्न लांबच्या देशातील मुलीशी होणार आहे. ती मुलगी स्वतःहून याच्याकडे येईल आणि तिला संगीताची आवड असेल. तिच्याकडे मालकीचं जंगल असेल. त्या मुलीची रास वृषभ असेल.”

याविषयी महानंदिया लहानपणापासूनच ऐकत होते. त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत कधी घडतील याच विश्वासावर ते जगत होते. त्यांना भविष्य सांगताना असंही सांगण्यात आलं होतं की, ते कला आणि रंगाच्या दुनियेत रममाण होतील. त्यांना तशी लहानपणापासून चित्रकलेची आवड होतीच. ते सुंदर चित्रही रेखाटायचे.

महानंदिया यांना उडीसामधील काॅलेज आॅफ आर्ट्स जाॅईन करण्यासाठी स्काॅलर्शिप मिळाली होती. नशीब आजमवण्यासाठी ते दिल्लीतही आले. दिल्लीत ते रस्त्यावर पेटिंग बनवून विकायचे. बऱ्याचवेळा त्यांच्या पेटिंग कोणी घ्यायचं नाही. मात्र रस्त्यावरुन पोलिस त्यांना उचलून घेऊन जायचे. यावर महानंदिया म्हणाले की, “पोलिस स्टेशनला गेल्यावर जेवणाचा आणि झोपण्याचा प्रश्न मिटायचा. त्यामुळे कधी कधी ते मुद्दाम पकडले जायचे.”

दिल्लीत तीन वर्ष काढल्यानंतर त्यांना भरपूर शिकयला मिळालं. स्ट्रीट आर्टीस्ट म्हणून त्यांची ओळख तयार झाली. एक दिवस अचानक पंतप्रधान इंदिरा गांधींनी रशियन आंतराळवीर व्हॅलेंटिना टरेश्कोवा यांना भारतभेटीसाठी बोलावलं होतं. महानंदिया म्हणाले की, तेव्हा एवढ्या गर्दीमधून व्हॅलेंटिना त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी मला पाहिल्यावर भारत-रशिया पार्लमेंटरी क्लबमध्ये बोलावलं. त्यांची दहा पोर्टेट्स मी काढून दिली आणि रातोरात प्रसिद्ध होऊन पहिल्यांदाच टिव्हीवर झळकलो.

ज्यांच्यासोबत महानंदिया यांची लग्नगाठ बांधली जाणार होती त्या शार्लेट वाॅन शेडविन त्यांना 17 डिसंबर 1975 ला पहिल्यांदाच भेटल्या. निळेभोर डोळे, लांब सोनंरी केस शार्लेट ला पाहताच ते तिच्या प्रेमात पडले. महानंदिया म्हणाले की, ती पेंटिग काढून घेण्यासाठी त्यांच्याकडे आली होती. मी तिला दोन-तीन वेळा बोलावलं पण तिचं सौदर्य मला चित्रात उतरवता आलं नाही. तेव्हा मला माझ्या भविष्याची आठवण आली आणि मी तिला काही प्रश्न विचारले आणि सगळं भविष्यात सांगितल्याप्रमाणे होते. तेव्हा त्यांनी तिला भविष्याबद्दल सांगत तुच माझी पत्नि होशील असं सांगितलं.

यावर शार्लेट म्हणाल्या की, “मला तेव्हा याचा राग आला नाही. कारण मला पहिल्यापासून भारताची ओढ होती आणि मला कोर्णाक मंदिरही पहायचं होतं. तर मी त्याला फक्त तुझ्या गावी घेऊन चल असं म्हटलं.”

महानंदिया यांच्या घरी आदिवासी पद्धतीनं छोटोसा कार्यक्रम झाला आणि त्याचं लग्न लावून देण्यात आलं. त्यांनंतर ती तीन आठवडे त्यांच्यासोबत राहिली आणि मग स्वीडनला परत गेली. त्यांनंतर दिड वर्ष त्यांचा पत्राद्वारे संपर्क व्हायचा. मात्र महानंदिया यांना शार्लेटपासून दूर राहणं सहन होत नव्हत. त्यांनी त्यांच्याकडील सर्व सामान विकलं आणि त्यातून विमानाचं तिकिट घेणं शक्य नसल्यानं त्यांनी एक सायकल खरेदी केली आणि सोबत 80$, काही रुपये सोबत घेतले आणि युरोपला जायला निघाले.

7000 मैलाचा हा प्रवास सोपा नव्हता मात्र या प्रवासात शार्लेटनं त्यांना पत्राद्वारे साथ दिली. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला. 22 जानेवारी 1977ला त्यांनी प्रवास सुरु केला होता. ते रोज 70 मैल प्रवास करायचे. सायकल चालवून त्यांचे पाय दुखून यायचे मात्र शार्लेटला भेटण्याचा आनंद याच्यासमोर जास्त होता. 28 मे 1977 रोजी ते स्वीडनला पोहचले. युरोप त्यांच्यासाठी नवीन होता. ते पहिल्यांदाच ती संस्कृती पाहत होते. त्यांनी शार्लेटच्या घरी जाऊन आई-वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे एकून त्यांना धक्काच बसला. परंतू त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी  दिली.

महानंदिया यांनी त्यांच्या प्रेमासाठी केलेल्या प्रवासामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर हाॅलिवूडमध्ये त्यांच्या या सायकल प्रवासावर चित्रपट निघतोय. सध्या ते स्वीडन मधे आर्ट शिक्षक म्हणून काम करतात. महानंदिया आणि शैर्लेट यांना दोन मुलं आहे.

खऱ्या प्रेमासाठी माणूस कोणतीही गोष्ट करु शकतो हे महानंदिया यांनी सिद्ध करुन दाखवलं.

महत्वाच्या बातम्या – 

आजीचा पदर धरत ‘बाहेर जाऊ नकोस करोना होईल’…

चक्क चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी पद्धत, पाहा व्हायरल…

वडिल इरफान खान आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बाबिलनं व्यक्त…

IPL 2021: चुरशीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर 18 धावांनी विजय

फेस सर्जरी करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात,…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy