लग्न करून देखील आयुष्यभर एकटी राहिली ‘ही’ अभिनेत्री; कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल!

मुंबई | पडद्यावरील प्रत्येकंच कलाकाराची पडद्यामागे देखील एक वेगळी कहाणी असते. प्रत्येक कलाकार पडद्यामागील आपल्या आयुष्यात कडू गोड गोष्टींना सामोरं जात असतो. पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या आवडत्या कलाकाराच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय? हे जाणून घेण्याची चाहत्यांना देखील उत्सुकता असते. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीच्या पडद्यामागील आयुष्याविषयी तुम्हाला सांगणार आहोत.

अभिनेत्री जयाप्रदा यांनी आपल्या अभिनयामुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. जयाप्रदा यांची नजाकत, सौंदर्य आणि नृत्याने नेहमीच चाहत्यांना भुरळ घातली आहे. जयाप्रदा यांचं खरं नाव ललिता राणी असं होतं. मात्र, चित्रपट सृष्टीत आल्यानंतर ललिता राणीचं त्यांनी जयाप्रधान केलं.

जयाप्रदा यांचे वडील कृष्णा राव तेलगू चित्रपटांचे फायनान्सर होते. जयाप्रदा यांनी देखील तेलगू चित्रपाटातूनच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी जयाप्रधा यांना केवळ 10 रुपये मानधन मिळालं होतं. ‘भूमीकोसम’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.

1986 मध्ये जयाप्रदा आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी होत्या. या काळात त्यांचे अनेक पिक्चर्स हीट जात होते. अशातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जयाप्रदा यांनी निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत यांना अगोदरंच तीन मुले होती.

याच दरम्यान जयाप्रदा यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली. यानंतर पुन्हा जयाप्रदा यांचं आयुष्य उलटी पाऊले टाकू लागलं. नाहटा यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच जयाप्रदा यांच्याशी विवाह केला. यामुळे चित्रपट सृष्टीतील सर्वांसाठीच ही एक धक्कादायक बाब होती.

जयाप्रदा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर देखील नाहटा यांना पहिल्या पत्नीपासून आणखी एक मूल झालं. शेवटी जयाप्रदा यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेत त्याचं पालनपोषण केलं.

या दरम्यान जयप्रदा यांच्या फिल्मी करिअरचा ग्राफ पूर्ण खाली आला होता. लग्नानंतर देखील त्यांनी चित्रपटांत काम करणं चालू ठेवलं. मात्र, हळूहळू त्यांना चित्रपट मिळणं बंद झालं. यानंतर त्यांनी काही काळ छोट्या पडद्यावर देखील काम केलं.

पुढे जाऊन जयप्रदा यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये जयप्रदा यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. 2004 ची निवडणूक जिंकत त्यांनी थेट लोकसभेत पाऊल ठेवलं. यानंतर 2014 मध्ये जयप्रदा यांनी राष्ट्रीय लोकल दलाचा तर पुढे भाजपचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या बातम्या –

जोरजोरात ओरडत ‘या’ महिलेने शोकसभेतच काढले कपडे; व्हिडीओ व्हायरल

सोनं पुन्हा प्रतीतोळा 56 हजारापार जाणार? गेल्या 15 दिवसांत सोन्याच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ

भारतातील सर्व नद्यांना स्त्री समजलं जातं, मात्र ‘या’ एकमेव नदीला पुरुष समजलं जातं; वाचा काय आहे कारण?

फडणवीसांचा मध्यरात्रीचा पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ; पाहा व्हिडीओ

लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल