400 दिवस रुग्णांची सेवा करुनही कोरोना ‘या’ डॉक्टरला काहीच करु शकला नाही कारण…

अहमदाबाद | देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांच्या राज्य सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. तसेच ती नियमावली पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्रा.ण देखील गमावले आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद मधील सिव्हील रुग्णालयातील डॉक्टर रजनीश पटेल देखील गेल्या 400 दिवसांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, हा व्हायरस त्यांना काहीही करु शकला नाही. रोज ते कोरोना रुग्णांच्या संपर्कात येतात. मात्र, त्यांंना एकदाही कोरोनाची लागण झाली नाही.

काही शास्त्रज्ञांच्या मते ओ पॉझिटीव्ह असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे. रजनीश पटेल यांचा रक्तगट देखील ओ पॉझिटिव्ह आहे. यामुळे खरंच ओ पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना कोरोना संसर्ग होत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

याविषयी बोलताना डॉक्टर रजनीश पटेल स्वत: म्हणाले की, ओ पॉझिटिव्ह ब्लड चागलं असतं. पण तरी ओ पॉझिटिव्ह आहे म्हणून कोरोना होणार नाही, असा समज लोकांनी करून घेऊ नये. असा काहीही अभ्यास झालेला नाही की, ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे म्हणजे कोरोना होणार नाही.

तसेच मी कोरोनासंबंधी नियमांचं पूर्णपणे पालन करत असतो. रुग्णालयात आणि घराबाहेर देखील मी मास्क लावतो आणि सोशल डिस्टन्सिंगही पाळतो. त्यामुळे कोरोना संसर्गापासून मी सुरक्षित आहे, असंही डॉक्टर रजनीश पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना वि.षाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यांत कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोना लसीकरण चालू झालं आहे. कोरोना लस सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणं हे दिलासा देणारं आहे.

देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जात आहे. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत आहे. मात्र, खासगी केंद्रावर काही शुल्क घेऊन लस दिली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक शहरांत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्नापूर्वी केलेल्या ‘त्या’ मोठ्या विधानावरून अनुष्काचा ‘यु टर्न’; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचं हे सुपर हॉट कपल लवकरंच विवाह बंधनात अडकणार?

सलाम! हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करतच राहिले; पाहा व्हिडीओ

सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर

535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप