आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर!

मुंबई | राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे दर राज्य सरकारने पुन्हा एकदा कमी केले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबत माहिती दिली आहे.

आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 350, 500 आणि 700 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 350 रुपये आकारले जातील.

रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वॉरन्टाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 500 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी 700 रुपये आकारण्यात येणार आहेत.

राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असं निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितलं.

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत.

अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 200, 250 आणि 350 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 300, 400, 500असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 100, 150 आणि 250असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा” 

“देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी केंद्रीय मंत्री झालो” 

‘मला BJP कडून केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट 

“सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरुये” 

महाराष्ट्रात Lockdown लागणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य…