मुंबई | मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करताना दिसतात. तसेच काहीवेळा एखाद्या मुद्द्यावर बेधडकपणे आपलं मत मांडताना देखील दिसतात.
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहणाऱ्या कालाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर. स्वरा सोशल मीडियावर नेहमी बेधडकपणे आपलं मत मांडताना दिसते. गेल्या काही दिवसांमध्ये स्वराने सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मात्र, ही वक्तव्य स्वराच्या आता चांगलीच अंगलट येण्याची शक्यता आहे.
स्वराने एक ट्वीट करत हिंदुत्वाची तुलना तालिबान्यांशी केली होती. यामुळे देशभरातून स्वराविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोक स्वराला अटक करण्याची मागणी करत आहेत.
याप्रकरणी देशभरात विविध ठिकाणी स्वराविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वराला एका ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहेत. अशातच आता स्वराने एक पोस्ट लिहीत ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. स्वराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीत तिचे मत मांडलं आहे.
या पोस्टमध्ये स्वरा म्हणाली की, सोशल मीडिया हे एक व्हर्चुअल सार्वजनिक ठिकाण आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी जसा शिष्टचार पाळला जातो तसा सोशल मीडियावर पाळला जात नाही. याठिकाणी मी एका फुलाचे फोटो देखील शेअर करु शकत नाही आणि ते मी शेअर केलेच तर त्याचे कनेक्शन वीर द वेडिंगच्या हस्तमैथुन दृष्याशी केले जाते.
तसेच हा एक सायबर लैंगिक छळ आहे. या छळाला कोणीही बळी पडू नये. या पब्लिक प्लेसला कोणीही नकारात्मकता पसरवण्यासाठी वापरु शकत नाही. हा छळ करुन मला कोणीही रोखू शकत नाही, असं देखील स्वराने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
स्वराची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक या पोस्टनंतर स्वराच्या बाजूने उभे ठाकले आहेत तर काही लोक तिला ट्रोल करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ बड्या अभिनेत्यावर गुन्हा दाखल, महिला रायटरची केली फसवणूक?
अभिषेकच्या ‘या’ गोष्टीवर आहे ऐश्वर्याचं प्रेम, म्हणूनच केलं बीग बींच्या मुलाशी लग्न
…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर
इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट
जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका