‘निर्बंध हटवले तरी…’; राजेश टोपेंचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

मुंबई | कोरोना महासाथीची लाट आता आटोक्यात येत आहे. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

कोरोनाचा शिरकाव कमी झाल्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. अशतच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

करोना संदर्भातील निर्बंध राज्यात हटविण्यात आले असले, तरी नागरिकांनी लसीकरण मात्र करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

करोना प्रतिबंधक लसीची ज्यांची पहिली किंवा दुसरी मात्रा बाकी असेल त्यांनी ती घ्यावी, कारण ते आरोग्यासाठी हितकारक आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

निर्बंध जरी दटवले असले तरी अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं संपूर्ण निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचं नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना (Corona) महासाथीच्या रोगानं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना साथीच्या रोगानं अनेकांचं नुकसान करत संपूर्ण जनजीवन विस्कळीत करुन टाकलं होतं. मात्र सर्व पूर्वपदापवर येताना दिसत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रूग्ण वाढत चालल्याचं चित्र एकीचडे पहायला मिळत आहे. त्यामुळे अद्यापही धोक्याचं सावट टळलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

  “शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन”

  मनसेला मोठा झटका! वसंत मोरेंनंतर 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

  मोठी बातमी! मनसेतून बाहेर पडताच वसंत मोरेंना शिवसेनेची ऑफर

  पुढील 3 दिवसांत उष्णतेची लाट, ‘या’ 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

  सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त