Top news देश

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!

Traffic Police on Road

नवी दिल्ली | दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. मात्र, वाहतूक पोलिस हेल्मेटशिवाय दुचाकी किंवा स्कूटर चालवल्यास चालान कापतात. मात्र वाहतुकीच्या नियमांनुसार तुम्ही हेल्मेट घालून दुचाकी चालवली तरीही तुमचं चलन कापलं जाऊ शकतं. हेल्मेट घातलं तुम्हाला 2000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

मोटार वाहन कायद्यानुसार, बाईक किंवा स्कूटर चालवताना स्वाराने हेल्मेट घातलं नाही, तर त्याला नियम 194D MVA नुसार ₹ 1000 चे चलन केलं जाईल.

जर कोणी सदोष हेल्मेट घातलेलं किंवा BIS नोंदणी असलेले हेल्मेट घातलेलं आढळलं तर, 194D MVA नुसार रायडरला ₹ 1000 पेक्षा जास्त दंड होऊ शकतो.

दोन वर्षांपूर्वी, केंद्र सरकारने केवळ दुचाकी वाहनांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) प्रमाणित हेल्मेट तयार करणं आणि विकणं बंधनकारक केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षा समितीने मार्च 2018 मध्ये देशात हलक्या हेल्मेटची शिफारस केली होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अलीकडेच सुरक्षा नियम अद्ययावत केले आणि चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकीवर नेण्यासाठी नवीन नियम केले.

याशिवाय दुचाकीचा वेग ताशी 40 किमीपेक्षा जास्त असू शकत नाही. नवीन वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास ₹1,000 चा दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केलं जाऊ शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-  

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”  

“इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा”