Top news

सापही ‘या’ प्राण्यासमोर आपला फणा काढायला बिचकतो, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@susantananda3

नवी दिल्ली | आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ डान्सचे असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. काही व्हिडीओ तर असे असतात, तर ते पाहून आपल्या अंगावर काटा येईल. इतके भितीकायक असतात.

यापूर्वी आपण कित्येक तरी व्हिडीओ हे भांडणाचे पाहिले असतील. त्यातील बहुतांश व्हिडीओ हे माणसांच्या भांडणांचे पाहिले असतील. परंतू काय तुम्ही दोन प्रण्यांमधील भांडण पाहिलीत का?. नसेल पाहिली तर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आपल्याला माहिती असेल की, साप हा कोणत्याच प्राण्याला घाबतर नाही. मात्र तो मुंगसालाच घाबरतो. साप मुंगसासमोर कधीच जात नाही. लांबून जरी ते दिसलं तरी तो त्याची वाट बदलतो. परंतू मे वाक्य पूर्णपणे सत्य राहिलं आहे. यात थोडी शंकाच आहे. कारण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये साप चक्क एका मांजराला घाबरून पळून गेला असल्याचं दिसून येतं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मांजर एका लहानशा खोक्यामध्ये खेळत आहे. तेवढ्यात एक साप त्या ठिकाणी हळू-हळू येत आहे. साप मांजरासमोर जाऊन फणा काढतो. हे पाहून ते मांजर त्या सापाला आपल्या पंजानं मारायला सुरूवात करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. सापही त्या मांजरावर फणा मारत आहे. परंतू मांजर जोर-जोरात आपल्या पंजाने त्याला आपली नखे ओरबाडतं आहे.

काही वेळ असंच सुरू राहतं आणि आपली हार स्विकारून, साप त्या ठिकाणाहून निघून जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

व्हायरल होत असलेला साप आणि मांजराचा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘निश्चयाला कधीही कमी लेखू नका’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 15 हजार लोकांनी पाहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! टी-शर्टवरच छापून घेतलं वॅक्सिनेशन सर्टिफिकेट कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

लग्न मंडपातच घरच्यांनी नवरदेवाला घ्यायला लावला नवरीचा ‘किस’, पाहा व्हिडीओ

पिसाळलेल्या बैलाने मैैदान सोडून अचानक प्रेक्षकांकडे घेतली धाव अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

बाहुबलीच्या स्टाईलमध्ये म्हशीला उचलायला गेला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

सात फेरे घेताना नवरीच्या लेहंग्याला लागली आग अन्…, पाहा व्हिडीओ