केसाला आग लागली तरी महिला करत राहिली काम अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही खूपच धक्कादायक आणि भितीदायकही असतात.

अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणवर व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, महिलांना घरात खूप काम करावं लागतं. विशेष म्हणजे किचनमध्ये कोणताही सण असो नाहितर सगळ्या नोकरी करणाऱ्या पुरूषांना सुट्टी.

मात्र महिलांना किचनमधून कधीच सुट्टी नसते. त्या खूपच घरामध्ये राबत असतात. काही महिलातर जीवाचं राण करत सर्व घर सांभाळत असतात. या सगळ्यात त्या त्यांच्या शरिराकडं लक्ष देत नाहीत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ याच संदर्भातील असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेला काम करत असताना, तिच्या केसांना आग लागली तरी ती कामच करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एक महिला आपल्या घरातील किचनमध्ये काम करत असून, ती गॅसपाशी काहीतरी करत आहे. ती काहीतरी घ्यायला खाली वाकते तेवढ्यात तिचे केस गॅसला लागतात आणि त्या केसांना आग लागून त्या ठिकाणाहून थोडा धूरही यायला सुरूवात होते. तरीदेखील त्या महिलेला काय घडत आहे, याची काहीच कल्पना नसल्याचं समजतं आहे.

केसांची आग वाढत चालली असून, तिच सर्व लक्ष त्या कामातच आहे. ती त्या किचनमध्ये इकडून-तिकडं फिरत आहे. अचानक आग मोठी होते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या केसांना आग लागली आहे. त्यानंतर ती तातडीने आपल्या हातांनी डोक्यावर हात फिरवते आणि लागलेली आग विझवायचा प्रयत्न करते.

या महिलेचा हा व्हिडीओ खूप व्हायर होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच अनेक लोकांनी व्हिडीओ पाहून कमेंट्य देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क कुत्रा खेळतोय वॉलिबॉल, पाहा व्हायरल व्हिडीओ

गाडीत सामान ठेवायला गेली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

आजीने अशी काही मागणी केली की; ती ऐकून ऐलेक्सा ही गेली गोंधळूण, पाहा व्हिडीओ

झाड तोडायला गेला अन्; पुढं जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

काय सांगता! चक्क कुत्राही थिरकतोय त्याच्या आवडीच्या गाण्यावर, पाहा व्हिडीओ