आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ, वाचा काय आहे दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. तर आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्याचं बोललं जात आहे.

आज शनिवार 16 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार, पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटरच्या किंमतीमध्ये तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 102.13 रूपये आहे. तसेच पॉवर पॅट्रोलचा दर 115.38 रूपये असल्याची माहिती समोर येतं आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 105.47 रूपये आहे आणि डिझेलचा दर 94.27 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत”

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे

दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदलेल्या मेंढरासारखी झाली आहे”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला, झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ