सुपरस्टार सलमान यावर्षी नाही सेलिब्रेट करणार त्याचा वाढदिवस, वाचा काय आहे यामागे कारण?

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खान आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य करत असतो. आज जगभरात सलमानचे करोडे चाहते आहेत.

सुपरस्टार सलमान खानचा 27 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी सलमान खान वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत असतो. त्याच्या वाढदिवशी सलमान खान आपल्या फार्म हाऊसवर मोठ्या पार्टीचं नियोजन करत असतो. मात्र, यावर्षी सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

सलमान खान यावर्षी त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. यावर्षी तो फार्म हाऊसवर कोणत्याही पार्टीचं नियोजन करणार नाही. सलमान सध्या कामात व्यस्त असल्यानं तो वाढदिवस साजरा करणार नसल्याचं बोललं जात आहे.

माहितीनुसार सलमान आपल्या बर्थडे दिवशी देखील शूटिंगमध्ये व्यस्त असेल. सलमान खानला चित्रपटाचं काम लवकर पूर्ण करायचं असल्या कारणाने तो यावर्षी बर्थडे साजरा करणार नाही. मात्र, सलमानच्या या निर्णयानंतर त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहेत.

दरम्यान, सलमान खान सध्या ‘अंतिम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आहे. 27 तारखेला सलमान याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. सलमान खान या चित्रपटात सिख कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचा टीजर देखील लौंच करण्यात आला आहे. टीजरमध्ये सलमान खान हटके स्टाईल मध्ये एन्ट्री मारताना दिसत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

अंतिम चित्रपटाबरोबरच पुढच्या वर्षी सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधे या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा आहेत. या चित्रपटात देखील सलमान खान हटके भूमिकेत पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संजय राऊतांवर ‘त्या’ प्रकरणी कारवाई करा, भाजप नेत्याचा हल्लाबोल!

धक्कादायक! पुण्यात अ.टक केलेल्या ‘या’ माजी आमदाराला जबर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

‘अजित पवार तुम्ही रडता, फोन बंद करून लपून बसता आणि…’; निलेश राणेंचा अजित पवारांवर घणाघात

महिन्यात सलग दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरचे दर वाढले, वाचा आजचा दर

भाजपच्या नगरसेवकांचा राडा! डोक्यात हेल्मेट घालून नगरसेवकांनी केलं ‘हे’ अजब कृत्य; पाहा व्हिडिओ