‘रिप्ड जीन्सची सर्वांनाच चिंता या रिप्ड शर्टचं काय?’ ‘या’ गायकाची मजेशीर पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई| उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “या महिला फाटके कपडे घालून का फिरतात? हे कसले संस्कार?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. यावर अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया मांडली. अशातच बॉलिवूड सिंगर अदनान सामी यानंही याच्यावर आपली मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

अदनान सामी यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर सोशल मीडियावर ‘रिप्ड जीन्स’ हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. यावरच अदनानं एक मजेशीर पोस्ट टाकली आहे.

शर्टच्या दोन बटणांच्या गॅपमधून एक पुरुषाचे पोट दिसतेय आणि त्याच्यामागे रिप्ड जीन्स घातलेली एक मुलगी बसलेली आहे. हा फोटो शेअर करतअदनानं लिहिलं की,  ‘आपण सगळे याबद्दल चिंतीत आहोत, मग आपले याच्याशी काही देणेघेणे असो वा नसो. या रिप्ड शर्टबद्दल आपण चिंता व्यक्त करणार आहोत का?’

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं होतं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सगळ्यात आधी विरोध हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने केला होता. तिने स्वत:चा रिप्ड जीन्समधला फोटो शेअर करत याला विरोध दर्शवला होता.

महत्वाच्या बातम्या – 

‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’…

‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा…

‘…बादशाह को बचाने में कितनो की जान…

जाणून घ्या! केशर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

गुन्हेगाराकडून पोलिसाला बेदम मारहाण, कारण ऐकूण तुम्हालाही…