विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन

मुंबई | अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. जगभरात त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विद्युत सोशल मीडियावर नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्याबद्दल गोष्टी तसेच फिटनेस टीप्स शेअर करत असतो.

तरुणांच्या मनावर राज्य करणारा हा विद्युत सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. विद्युतने काही महिन्यांपूर्वी एक खास फोटो शेअर केला होता. यामुळे त्याची लव्ह लाईफ सर्वांसमोर आली होती.

विद्युत फॅशन डिझायनर नंदिता महातनीला डेट करत आहे.नंदिता आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचं खास कनेक्शन आहे. नंदिता सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक फोटोज शेअर केले आहेत.

यामध्ये काही फोटोज हे विद्युत जामवालचे देखील आहेत. यामुळे चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल हींट मिळाली आहे. काही फोटोजवर नंदिताने इंद्रधनुष्याचे इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

नंदिता जरी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विद्युतचे फोटोज शेअर करत असली तरी तिने अद्याप या नात्यावर खुलेपणाने भाष्य केलं नाही. तसेच विद्युतने देखील अद्याप आपल्या रेलेशनशिपची कबुली दिली नाही.

नंदिता महातनीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून विद्युतला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यासाठी तिने स्पेशल पोस्ट केली होती. यावर विद्युतने देखील प्रतिक्रिया दिली होती.

विद्युतला शुभेच्छा देताना नंदिता म्हणाली होती की, शुभेच्छा V! तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला यश, प्रेम आणि गुडलक. यावर विद्युतने अगदी प्रेमळपणे प्रतिक्रिया दिली होती. नंदिताला प्रतिक्रिया देताना विद्युत म्हणाला की, धन्यवाद नंदू बेबी.

दरम्यान, नंदिताने अनेक मोठमोठया कलाकारांची कपडे डिझाईन केली आहेत. ती संजय कपूर यांची पहिली पत्नी आहे. या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी करिश्मासोबत लग्न केलं होतं. परंतु या दोघांचं नातं देखील खूप काळ टिकलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ

तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणं स्वरा भास्करला महागात पडलं, FIR दाखल?

कंडोममध्ये सोनं घालून महिलांनी अशा जागी लपवलं की पाहून मुंबई पोलीसही चक्रावले!

संतापलेल्या ऐश्वर्याने ‘या’ कारणाने अभिषेकला दोन रात्री ठेवलेलं रुमबाहेर

पाकने माधुरी दीक्षित यांना मागितल्यानंतर ‘शेरशाह’ बत्रांनी दिलेल्या उत्तराने शत्रू हादरले होते