माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका!

मुंबई |  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीसांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का आहे.

2014 च्या निवडणूक शपथ पत्रात 2 गुन्हे लपवल्याप्रकरणी आता सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे. न्यायालयाने तशी परवानगी दिली आहे. याअगोदर देखील त्यांनी याप्रकरणी नागपूरच्या न्यायालयात हजेरी लावली होती.

देवेंद्र फडणवीस हे 20 फेब्रुवारीला नागपुरातील JMFC न्यायालयात सुनावणीसाठी कोर्टात हजर राहिले होते. कोर्टाने फडणवीसांना 15 हजाराच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“संपादकपदी रश्मी ठाकरे म्हणून सामनाची भाषा बदलणार नाही, संपादकीय राऊतांकडेच”

-‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल

-विद्या चव्हाणांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले; म्हणतात, ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध’!

-मोदींनी सोशल मीडिया सोडू नये; त्यांचे करोडो फॅन्स अनाथ होतील- संजय राऊत

-“पवारांच्या धसक्यामुळे तर मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला नसेल ना??”