अमरावती | काल सलग पाचव्या वेळी राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूढे ढकलल्या. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर याचे गंभीर पडसाद उमटले. राज्य सरकारने सलग पाचव्या वेळी परीक्षा पूढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आणि यानंतर बघता बघता महाराष्ट्रतील राजकीय वर्तुळात देखील त्याचे पडसाद उमटू लागले.
विरोधी पक्षनेत्यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि ते विद्यार्थ्यांबरोबर रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने हिं.सक वळण घेतलं. अमरावतीमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनाला देखील हिंसक वळण प्राप्त झालं होतं.
अमरावती पोलिसांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवर यावेळी ला.ठीचार्ज देखील केला आहे. तसेच आंदोलना दरम्यान पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना ओढून ता.ब्यात घेतलं. यामुळे माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे या मुद्द्यावरून चांगलेच आ.क्रमक झालेले पाहायला मिळाले.
अनिल बोंडे आणि पोलीस निरीक्षक चोरमले यांच्यात आंदोलना दरम्यान चांगलाच वाद झाला. यावेळी बोंडे यांनी राज्य सरकारसोबत पोलिसांना देखील अपशब्द वापरले. यानंतर अमरावती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. अनिल बोंडे यांनी स्वतः या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे.
बोंडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बोंडे विद्यार्थ्यांबर रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी ते विद्यार्थ्यांची बाजू मांडताना पोलिसांना तुम्ही सरकारचे कुत्रे आहात, असे शब्द वापरतात. यावर चोरमले देखील बोंडे यांना तुम्ही पण कुत्रेच आहात, असं बोलतात.
अनिल बोंडे यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करत चोरमले यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे.
अनिल बोंडे ट्वीट करत म्हणाले की, चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आतमध्ये टाकलंय विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस निरिक्षक चोरमले यांना तात्काळ निलंबित करा आणि 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्य सरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे. भाजपा विद्यार्थ्यांसोबत आहे.
चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आत मध्ये टाकलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा व 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्यसरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे. भाजपा विद्यार्थ्यांसोबत आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/A6QdFrpC7A
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) March 11, 2021
महत्वाच्या बातम्या –
‘आता चाय पे चर्चा होऊनच जाऊद्यात’; नाईक कुटुंबियांचं भाजपला खुलं आव्हान
हवेत उडणारी कासवं तुम्ही पाहिलीत का? नक्की पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ
तिने नवऱ्याला खुर्चीला बांधलं, पॉ.र्न व्हिडिओ दाखवले अन् पुढे जे केलं त्याने महाराष्ट्र हा.दरला!
कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी कसं पकडलं? संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद; पाहा व्हिडिओ
ग्राहकांसाठी खुशखबर! सहा महिन्यांत सोनं तब्बल 22 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे दर