महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच; काँग्रेसचं विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई | भाजप सरकारच्या काळात महापरिक्षा पोर्टल भ्रष्टाचाराचे कुरण बनलेलं होतं, असा आरोप करत कोणत्याही परिस्थितीत आता महाविकास आघाडीचं सरकार महापरिक्षा पोर्टल रद्द करणारच, असं आश्वासन काँग्रेसने राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं आहे.

महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून कायमच होत आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज पुढाकार घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत बैठक घडवून आणली. या बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक मदन नागरगोजे, महाऑनलाईन कंपनीचे प्रसाद कोलते तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधींनीतर्फे 32 मुद्दे मंत्री महोदयापुढे मांडले गेले. राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून पाठपुरावा करण्याची हमी दिली.

परीक्षाव्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास असला पाहिजे. त्या अनुशंगाने महापरीक्षा पोर्टल रद्द करुन पर्यायी विश्वसनीय आणि पारदर्शक परीक्षाव्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरून भरती प्रक्रिया लवकरच सुरू करता येईल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असं तांबे यांनी सांगितलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

आमदार मनीषा कायंदेंचा मोदी भक्तांना खडा सवाल; म्हणाल्या, असं करायला तुमची मजबुरी तरी काय?

-चॅलेंज स्विकारलं तर 2 वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल… अशक्य काही नाही- शरद पवार

-विद्यार्थ्यांना प्रार्थना आणि प्रतिज्ञेनंतर म्हणावी लागणार ‘संविधानाची उद्देशिका’; शासनाचा स्तुत्य निर्णय

-छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरेंचा अपमान; सुप्रिया सुळे संतापल्या