नवी दिल्ली | आजच्या या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्य बिघडताना दिसत आहे. काही लोकांना अतिविचार करण्याची सवय असते. ज्यामुळं मानसिक आरोग्य बिघडू शकतं.
अतिविचार करणं ही एक मानसिक समस्या आहे. ज्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. जन्मापासून ही समस्या कोणालाच नसते. मात्र जसजसे आपण मोठे होत जातो.अतिविचार, ताणतणाव या समस्याही जन्माला येत असतात, असं मानसशास्त्रज्ञ आणि थेरपिस्ट डॉ. केतम हमदान यांनी झी न्यूजशी बोलताना सांगितलं.
अतिविचार ही समस्या थांबवण्यासाठी, सर्वात पहिल्यांदा त्यामागची भीती ओळखणं गरजेचं आहे. नैराश्य, असुरक्षितता, चिंता या भावनांमुळेही ही समस्या उद्भवू शकते, असं डॉ. केतम यांनी सांगितलं आहे.
अतिविचारामुळे लोक डिप्रेशन मध्येही जाऊ शकतात. अशा परिस्थितीचा परिणाम काही वेळा व्यक्तींच्या बोलण्यावर आणि हालचालींवरही होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, कोणतंही काम करताना तुम्ही ओव्हरथिंकींग करु लागलात तर काम सोडून 5 मिनिट चालावं. यामुळं मेंदूमध्ये फील-गुड एंडॉर्फिन हार्मोन्स तयार होतात आणि आपल्या थिंकिंगला पुर्णविराम मिळतो.
अतिविचारामुळे थकवा, निद्रानाश, डोकेदुखी, मानसिक तणाव होऊ शकतो. जर तुम्ही अतिविचारांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असही डॉ. केतम सांगतात.
अतिविचार करणं टाळावं. त्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्याच्या राजकारणात खळबळ! मंत्री सत्तारांवर माहिती लपवल्याचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”
येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा