मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर मलिक यांच्या विरोधात आरोपांचे व पुराव्यांचे बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट करून सस्पेन्स वाढवला आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटनं राजकारणात खळबळ माजली आहे. कारण हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
नवाब मलिकांच्या या ट्विटनंतर लोकांमध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. रविवारी मलिक कोणत्या मुद्द्यावर बोलणार, यावर लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.
‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे…’ असं मलिक यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर, काही वेळानंतर त्यांनी हे ट्वीट केलं आहे.
नवाब मलिक यांनी मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलचाही उल्लेख केला आहे. या हॉटेलमध्ये अनेक गुपितं लपली आहेत. रविवारी भेटू,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
‘हॉटेल ललित’मध्ये नेमकं काय घडलंय? त्याचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे 10 कोटींचे कपडे घालतात, ते 70 हजारांचा शर्ट आणि 50 लाखांचे घड्याळ वापरतायेत. वानखेडे यांच्या शूजची किंमत अडीच लाख रुपये आहे. पीएम मोदींच्या कपड्यांपेक्षा वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत जास्त आहे, असं ते म्हणाले होते.
समीर वानखेडे यांच्या पँटची किंमत एक लाख रुपये आहे. समीर वानखेडे यांनी ही वसुली केली असून त्याची चौकशी झाली पाहिजे, यावर मी ठाम आहे, असंही नवाब मविकांनी म्हटलंय.
दरम्यान, अमली पदार्थांचा खुलेआम खेळ कुठेतरी राजकीय आश्रयाशिवाय चालू शकत नाही, असे आरोप नवाब मलिक यांनी मंगळवारी केलेत.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
हलगर्जीपणा नडणार?, कोरोनाबद्दल नवी माहिती समोर आल्यानं जगाचं टेन्शन वाढलं
“देशातील जनता मोदी सरकारच्या स्वस्ताईच्या देखाव्याला भुलणार नाही”
कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बंपर गिफ्ट; ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ