मुंबई | शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर काही दगडफेक करण्यात आली होती आणि चपलाही फेकण्यात आल्या होत्या. याबाबत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गंभीर आरोप केले आहेत.
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत आव्हाड म्हणाले की, आंदोकांचा हेतू स्वच्छ नव्हता, यात शरद पवारांना शारिरीक इजा (Injured) करायची होती, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी हल्ल्याआधी पवारांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना शरद पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे नशीब आहे की असं काही घडलं नाही अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत वयाच्या 82 व्या वर्षीही शरद पवार वन मॅन आर्मी आहेत, असं सांगण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहे त्यासाठी ते नागपूरात दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते, तसेच यावेळी कॉंग्रेस नेतेही उपस्थित होते, यावेळी राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर शरद पवार अमरावतीसाठी रवाना झालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
थेट युक्रेनमध्ये पोहोचले ब्रिटेनचे पंतप्रधान; झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज
“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय”
अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार