मुंबई | कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन केला आणि घोटाळा केला. त्यामुळे परबांनो, बॅग भरा, तयारी करा, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांना दिला आहे.
माझा रिसॉर्टशी काहीच संबंध नाही असं अनिल परब गेल्या सहा महिन्यांपासून रोज बोलत आहेत. परबांनो, मोदी सरकारने याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. ही केंद्र सरकारची याचिका आहे. कोर्टाने त्याची दखल घेतली आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.
येत्या 16 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे परबांनो, बॅग भरा. तयारी करा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
पवार कुटूंबियांना ग्लिसरीनचा सप्लाय यायचा म्हणून ते रडायचे. पुढच्या आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखान्याचे 27 हजार शेतकरी मुंबईत येणार आहेत. हे शेतकरी ईडी कार्यालयात जाणार आहेत.
अजित पवार, शरद पवार यांनी घरच्या महिलांचा घोटाळ्यासाठी वापर केला. पवार परिवार शेतकऱ्यांना लुटणारं कुटूंब आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला
“यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल”
कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय!
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर; ‘या’ तारखेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी