झूम मिटींगमध्ये ‘या’ बड्या राजकीय नेत्याची पत्नी नग्नावस्थेत दिसल्यानं गदारोळ; व्हिडीओ व्हायरल

केपटाऊन | गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीमुळे आज जगभरात अनेक महत्त्वाच्या बैठका झूम मिटींगद्वारे घेतल्या जात आहेत. झूम मिटींगमुळे अनेक महत्वाची कामे घरबसल्या पार पडत आहेत. मात्र, या मिटींग्जमध्ये अनेक खळबळजनक प्रकार घडल्याचे आत्तापर्यंत अनेकवेळा समोर आलं आहे.

अशातच आता लाईव्ह झूम मिटींगमध्ये एक धक्कादायक प्रकार दक्षिण आफ्रिकेच्या संसदीय समितीच्या बैठकीत घडला आहे. लाईव्ह मिटींग चालू असताना संसदेच्या एका सदस्याची बायको मिटींगमध्ये नग्नावस्थेत दिसल्यानं राजकीय वर्तुळात एकंच गदारोळ उडाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संसदीय सदस्यांची झूम मिटींग चालू होती. या मिटींगला सर्व संसदीय सदस्य उपस्थित होते. संसदेतील Xolile Ndevu नावाचे सदस्य या मिटींगमध्ये कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांची माहिती देत होते.

Xolile Ndevu झूम मिटींगमध्ये बोलत असतानाच अचानक त्यांची पत्नी बाथरूममधून नग्नावस्थेत बाहेर आली. Xolile Ndevu समोर बोलत असल्याने त्यांचं देखील पाठीमागे लक्ष गेलं नाही. यामुळे काही क्षण Xolile Ndevu यांची पत्नी मिटींग दरम्यान नग्नावस्थेतच दिसली.

यामुळे संसदीय समितीच्या सदस्यांनी तातडीने ही बैठक जागेवर स्थगित केली. या बैठकीला दक्षिण आफ्रिकेतील 23 मोठे नेते उपस्थित होते. या घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेतील अनेकजण Xolile Ndevu यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.

30 मार्चच्या संसदेच्या झूम मिटींग दरम्यान ही गोष्ट घडली आहे. यानंतर मिटींग दरम्यानच्या या क्षणाची क्लीप सध्या सर्वत्र खूप वेगानं व्हायरल होऊ लागली आहे. लोक यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. देशभरात यावरून गदारोळ सुरू झाल्यानंतर Xolile Ndevu यांनी सर्वांची माफी मागितली आहे.

Xolile Ndevu म्हणाले की, मी उपस्थितांची माफी मागतो. माझं लक्ष कॅमेऱ्याकडे होतं. मागे काय सुरू आहे? कोण आहे? हे मी पाहिलं नव्हतं. तसेच झूम हे तंत्रज्ञान माझ्यासाठी नवीन आहे.

झूमसाठी आमचं प्रशिक्षण वगैरे काही झालं नाही. माझं घर लहान असल्याने बैठकीला स्वातंत्र्य खोलीची व्यवस्था नाही. बैठक 10 वाजता संपणार होती. मात्र, वेळ संपल्यानंतर देखील ही बैठक चालू होती. माझ्या बायकोला मिटींग चालू असेल, अशी पुसटशी कल्पना देखील नव्हती, असं स्पष्टीकरण Xolile Ndevu यांनी दिलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील राजकीय वर्तुळात एकंच गदारोळ उडाला आहे. यावरून Xolile Ndevu यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सलमाननं मला फसवलं’, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध…

जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?

शिवपार्वतीच्या आशिर्वादाने ‘या’ राशीच्या लोकांचा…

नैसर्गिक पद्धतीनं त्वचा निरोगी राहण्यासाठी करा संत्र्याच्या…