Top news विदेश

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

putin e1646312046680
Photo Credit- Twitter/@KremlinRussia_E

कीव | रशियन सैनिकांनी युक्रेनमधील अनेक निष्पाप तरुणींवर आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवर बलात्कार करून त्यांच्या शरीरावर स्वस्तिकसारखं चिन्ह काढल्याचा दावा युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंक यांनी केला आहे.

रशियन सैनिक युक्रेन नागरिकांच्या जाणुनबुजून हत्या करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे रशियावर चौफेर टीका झाली आहे. रशियावर आणखी निर्बंध घालण्याची भूमिका पश्चिमेकडील देशांनी घेतली आहे. तसं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.

युरोपियन युनियननं रशियाकडून होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर निर्बंध लादावेत, असा सल्ला जर्मनीच्ा संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

राजधानी कीव्हच्या आसपास 410 नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कीव्ह शहर रशियन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान,रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. रशियानं यापूर्वी यूक्रेनला घेरण्याची तयारी सुरु केली होती. यावर यूक्रेन वारंवार चिंता व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं 

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती” 

Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी

Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा

“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”