महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवणार असल्याचं दिसत आहे. भाजपने मिळवलेल्या या विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया (Maharashtra) येत आहेत.

देशात एक नेतृत्व नागरिकांनी मान्य केलं आहे आणि ते म्हणजे भाजपचं आहे. भाजपचे विचार, त्यांचे कर्तृत्व, वागणं, बोलणं यावर नागरिकांचा विश्वास आहे, असं भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलंय.

पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप बहुमत मिळवत मुख्यमंत्री बसवणार आहे. संपूर्ण देश हा लवकरच भाजपामय होईल, असं महाजनांनी म्हटलं आहे.

उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात देखील त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. महाजनांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

10 मार्चनंतर राज्यात सत्ताबदल होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात केलं होतं. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्. केलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता महाजनांनी देखील सूचक वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

पंजाबने राखला आम आदमीचा ‘मान’; झाडूकडून काँग्रेसचा सुपडा साफ 

‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं” 

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला