खळबळजनक! पुण्यात भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागून मृ.त्यू

पुणे | आजकाल हत्या, मारामारी यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगामुळे लोकांच्या मृत्यूचही प्रमाण वाढत चाललं आहे.

पुण्यात मात्र आत्मह.त्या, मारामारी यांच प्रमाण दिवसेंदिवस जास्तच वाढत आहे. अशातच एक गोळी लागून नगरसेविकेचा मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड  शहरातील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलगा प्रसन्ना चिंचवडे याची गोळी लागून मृ.त्यू झाला आहे. त्यानंतर प्रसन्नाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृ.त घोषित केलं.

ही घटना रविवारी 28 मार्च रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली होती. ही घटना घडल्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी पोहचले. पोलीस उपायुक्त मंचर इप्पर दिलेल्या माहितीनूसार होळीच्यानिमित्ताने चिंचवडे कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. प्रसन्ना त्याच्या रुममध्ये होता. अचानाक काही वेळानंतर प्रसन्नाच्या खोलीतून गोळीचा आवाज आला. त्यानंतर लगेच घरच्यांनी प्रसन्नाच्या खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी प्रसन्नाचा मृ.तदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

प्रसन्नाला लागलेली गोळी ही त्याचे वडील शेखर चिंचवडे यांच्याच बंदुकीतील असून, ती स्वत: वर झाडून घेतली असल्याचं दिसतं आहे. त्याचप्रमाणे प्रसन्नाने ही गोळी स्वत:वर झाडून आ.त्मह.त्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

रविवारी रात्री प्रसन्नावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे चिंचवडे कुटुंब संपूर्णपणे कोलमडून गेले आहेत. तसेच या घटनेमुळे सर्व शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रसन्नाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले. घटनेपूर्वी तो कोणाशी बोलला त्याला कोणाचे फोन आले होते आणि इतर सर्व बारीक-सारीक बाबींचा तपास केला जाणार असल्याचं मंचर इप्पर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंधांचे पालन होत…

खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर

महिलेचा भररस्त्यात धिंगाणा! म्हणतेय, ‘म.र्डर करून एका…

स्टंट करायला गेला पण चांगलाच अंगलट आला, चालू बाईकवर उभं…

एसबीआयची ग्राहकांना जबरदस्त भेट! आता अगदी कमी व्याजदरात…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy