हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

मुंबई | हिवाळी अधिवेशनानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यात दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत.

राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे.

राहुल गांधी यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्ष काँग्रेससाठी खरंतर सध्या विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 28 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.

हे मतदान आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. खरंतर आवाजी मतदानावर भाजपचा आक्षेप होता. यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीकडे 47 शिफारसी गेल्या होत्या. पण समितीने त्या सगळ्या शिफारसी फेटाळत आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदासाठी खूप रस्सीखेच सुरु आहे.

अध्यक्षपदासाठी 27 डिसेंबरला अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान पार पडील. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर 

अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर 

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’ 

“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…