कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

मुंबई | कोरोनाची परिस्थिती बदलत असताना लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोना आता कायमचा संपला आहे, असं समज करुन घेऊ नका. कारण हा व्हायरस अजूनही आपल्यामध्ये आहे.

कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर म्हणाले की, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. उत्परिवर्तनामुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो.

जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात. दरम्यान नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे, असंही ते म्हणालेत.

जगात एका आठवड्यासाठी सरासरी 15 लाखांहून अधिक प्रकरणे दररोज येत आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव कुमार अग्रवाल म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

मोदींचा गड असणाऱ्या वाराणसीत ममता थेट भाजप कार्यकर्त्यांना भिडल्या, झालं असं की…

रशिया-युक्रेन युद्धाचा SBI ला फटका; ‘या’ कारणामुळे कोट्यावधी रूपये अडकले

भारताच्या प्रयत्नांना यश! युद्धजन्य परिस्थितीत रशिया भारताला मदत करणार

  “सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज