महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने देशभरात धुमाकूळ घातला आहे. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. Omicron बाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्राचं टेंशन वाढलं आहे.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात Omicron ची प्रकरणे आढळून येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तज्ज्ञांनी मंत्रिमंडळात  राज्य मंत्रिमंडळाला यासंदर्भातली माहिती दिल्याचं समजतंय. जानेवारी महिन्यात आढळून येणारे हे रुग्ण केवळ मोठ्या शहरांतील नसून लहान शहरांतीलही असतील, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचं निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत. Omicron चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 73 रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण आढळले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या चार नवीन संसर्गांपैकी 2 रुग्ण उस्मानाबादमधील, 1 मुंबईतील आणि एक बुलढाण्यातील आहे.

यापैकी 3 रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधितांमध्ये 16 ते 67 वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावं. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

तसेच सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत” 

‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला, म्हणाले… 

महाराष्ट्रात पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…”